06 July 2012

ब ब्लॉगिंगचा...

लेखक:- Nitin Darekar at 5:04 PM
ब्लॉग म्हणजे काय ?
 ब्लॉग म्हणजे काय ? याचं निश्चित असे उत्तर देता येणार नाही. तुम्ही कोणत्या प्रकारे त्याकडे पाहता याच्यावर ते अवलंबून आहे. काही जणांसाठी ते आपले विचार जगापर्यंत पोहचवण्याचं माध्यम आहे. काहींसाठी ती एक वेबवरील डायरी आहे. काहींसाठी ते बातम्या देण्याचं माध्यम आहे. काहींसाठी ते आपलं साहित्य रसिकांपर्यंत पोहवण्याचं माध्यम आहे.  काहींसाठी ते तंत्रज्ञान सामान्यांना समाजवण्यासाठी उपयोगी पडते. काहींना आपले अनुभव इतरांपर्यंत फोटॊंच्या, विडियोच्या माध्यमातून पोहचवण्याचं साधन आहे. ही गणती न संपणारी आहे. मला कोणी विचारल तर मी एका शब्दात सांगतो ब्लॉग हे दुसरे तिसरे काही नसून नव्या युगाचं "माध्यम" आहे. साधं, सोप, सरळ, विनामुल्य उपलब्ध असलेलं "माध्यम"! तांत्रिक मुद्दे नंतर लक्षात घेऊया. उगाच पहिल्या पोस्टमध्ये ओहरडोस नको.

ब्लॉग असे नाव का ?
हा शब्द वेब आणि लॉग या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे. या दोन शब्दांबद्द्ल जास्त बोलण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत वाटत नाही.

ब्लॉगिंग म्हणजे काय ?
 ब्लॉग तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे ब्लॉगिंग !

ब्लॉगर म्हणजे कोण ?
 ब्लॉगच्या निर्मात्याला ब्लॉगर असे म्हणतात. तो एकटा असू शकतो किंवा एकापेक्षा अधिक जणांची टीम असू शकते.

ब्लॉग्जचे प्रकार 
 ब्लॉग्ज अनेक प्रकारांत विभागले जाऊ शकतात. काही महत्त्वाचे प्रकार - शैक्षणिक, तांत्रिक, फोटो ब्लॉग्ज, साहित्य प्रकारातील ब्लॉग्ज, रोजनिशीसारखे, आरोग्य विषयक, खेळांसंबधीत, करमणूकीचे, पाककलेविषयी आणि अनेक.

ब्लॉग तयार कुठे, कसा करावा हे पुढील लेखांमध्ये सविस्तर बघू. आज येथेच थांबूया.
टिप :-  तुम्हाला लेख कसा वाटला हे प्रतिक्रिया देऊन अवश्य कळवा. सूचना करा.  आपले सल्ले द्या.

0 comments:

Post a Comment

 

Copyright © Nitin Darekar टेक्नो मराठी |कॉपीराईट © नितीन दरेकर>