08 July 2012

कुठे सुरू करायचा ब्लॉग ?

लेखक:- Nitin Darekar at 4:07 PM
मागच्या पोस्टमध्ये आपण ब्लॉग, ब्लॉगिंग, ब्लॉगर याचा थोडक्यात आढावा घेतला. या पोस्टमध्ये आपण आपला ब्लॉग कोणकोणत्या साईट्सवर(संकेतस्थळांवर) विनामुल्य तयार करू शकतो याबद्दल जाणून घेऊया.


ब्लॉगर
    १९९९ साली प्यॅरालॅबकडून तयार करण्यात आलेली ही ब्लॉगिंग साईट, २००३ मध्ये गुगलने विकत घेतली. गुगलच्या अन्य सुविधांप्रमाणेच अल्पावधीतच जगभरातील असंख्य ब्लॉगर मंडळीच्या पसंतीस पडलेली ही सुविधा. जगभरातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध. टेंपलेट एडिट करण्यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण फीचर्समुळे ही ब्लॉगिंग साइट अतिशय लोकप्रीय ठरते आहे. सातत्याने नवनवीन फीचर्स समाविष्ट करून आपल्या युजर्सला संतुष्ट करण्यासाठी कायम प्रयत्नशील.

वर्डप्रेस
    वर्डप्रेस या अनेक मुक्त सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणार्‍या कंपनीकडून २००५ मध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली. blogger.com  प्रमाणेच ब्लॉगर्सची एक आवडती ब्लॉगिंग साइट. मार्च २०१२ पर्यंत वर्डप्रेसवर ७१ दशलक्ष ब्लॉगची नोंदणी करण्यात आलेली आहे.
       
अन्य काही ब्लॉगिंग साईट्स
Blogr

Blog

लाइव्हजर्नल

टेरापॅड  

Tumblr

Posterous

जगभरात लाखो ब्लॉगिंग साईट उपलब्ध आहेत.  येथे  आपण मुखत्त्वेकरून ब्लॉगर आणि वर्डप्रेसवरील ब्लॉगिंगबद्दल जाणून घेणार आहोत.

0 comments:

Post a Comment

 

Copyright © Nitin Darekar टेक्नो मराठी |कॉपीराईट © नितीन दरेकर>